मुंबई पुन्हा हादरली!! 14 वर्षाच्या मुलीवर 30 जणांकडून सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा विषय गंभीर बनला असताना आणि मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच अजून 1 हादरवणारी घटना घडली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 30 जणांनी मुलीवर बलात्कार केल्याने पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.  पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते.

या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

You might also like