पुण्यात 31 वर्षीय डिलिव्हरी बॉयची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील बंडगार्डन पुलावरून उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील वसंत म्हस्के असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो एजाड कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. येरवडा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अशी घडली घटना
बंडगार्डन पोलिसांना बंडगार्डन पुलावरून एका या इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच याची माहिती अग्निशामक दलाला देखील देण्यात आली. यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन मृत सुनीलला बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या खिशात असलेल्या आधारकार्डच्या आधारे त्याची ओळख पोलिसांनी पटवली.

मृत सुनील मस्के हा जयप्रकाश नगर, येरवडा येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. मात्र त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकलेले नाही. बंडगार्डन पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment