साताऱ्यात 32 चाकी ट्रेलर पलटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात सोनगाव कचरा डेपोनजीक 32 चाकी ट्रेलरचा विचित्र अपघात झाला आहे. ट्रेलर पलटी झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली.

सातारा शहरानजीक असलेल्या सोनगाव कचरा डेपो नजीक तीव्र उतारावर 32 चाकी महाकाय ट्रेलरचा विचित्र अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलरचा हुक तुटल्याने मागचा भाग वेगळा झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला.

सातारा बोगद्यातून शेंद्रे फाटा मार्गावर हा अपघात झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. हा ट्रेलर पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अपघातग्रस्त ट्रेलर क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

Leave a Comment