छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर । छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. पोलीस महानिरीक्षक पी.सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा आणि २२३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुंडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहीमेअंतर्गत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधरण सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत चकमकीस सुरूवात झाली. जेव्हा नक्षलींच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी जवान शोधमोहीमेवर निघाले होते. या परिसरात नक्षली दडून बसले असल्याची जवानांना माहिती मिळाली होती. दरम्यान, जवानांच्या शोधमोहीमेचा सुगावा लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या कारवाईत चार जणांचा खात्मा झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment