मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप – शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली असली तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. अनेक दिग्गज नेतेमंडळी मंत्रिपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्या घरी चकरा मारत आहेत. त्यातच आता मंत्रिपदासाठी ३ आमदारांना १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी ४ जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आपण दिल्लीतून बोलत असून वरिष्ठ नेत्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे. तुम्हाला जर मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी सदर भामट्यानी आमदारांना केली. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं.

येव्हडच नव्हे तर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांना पैसे देण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावले होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडला. आरोपीची सखोल चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी असे सदर आरोपींची नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment