Wednesday, February 8, 2023

धक्कादायक ! 40 वर्षिय महिलेवर सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक

- Advertisement -

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा तालुक्यातील रेंगेपार शेतीशिवारात एका ४० वर्षिय महिलेवर दोघांनी सामुहिक बलात्कार केला आहे. हि घटना ८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली. महत्वाचे म्हणजे अत्याचार करण्याचा व्हिडीओही तयार करुन महिलेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली.

या दरम्यान महिलेच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू चचाने व हरी उर्फ सेवक शेंडे अशी आहेत. पीडित महिला तालुक्यातील एका कंपनीमध्ये कार्यरत आहे. या दोघां आरोपींनी संधी साधुन या महिलेला रेंगेपार येथील शेतशिवारात नेऊन बलात्कार केला व याची कुठे वाच्यता करु नये म्हणून व्हिडीओही तयार केला व तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली.

- Advertisement -

या महिलेने १० जुलै रोजी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने केलेल्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाखनी पोलीस करत आहेत.