Sunday, February 5, 2023

दुबईहून येऊन तो धारावीच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत होता; मुंबई पोलिसांनी पकडले

- Advertisement -

मुंबई प्रतिनिधी | दुबईहून भारतात परतलेला एकजण धारावीच्या रस्त्यांवर बिनधास्त मध्ये फिरत होता. डाॅक्टरांनी हाॅम क्वारंन्टाईन सांगितले असून देखिल सदर इसम रस्त्यांवर फिरत असल्याचे समजताच मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हाती आलेल्या माहितीनुसार, ४३ वर्ष वयाचा एक इसम चार दिवसांपूर्वी दुबईहून भारतात आला होता. दुबईहून आल्याने आरोग्याची तपासणी करुन डाॅक्टरांनी त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची सुचना केली होती. मात्र सदर युवक चक्क धारावीच्या रस्त्यांवरुन फिरताना दिसला. ही बाब लक्षात येताच मुंबई पोलिसांनी या इसमास ताब्यात घेतले.

- Advertisement -

दरम्यान, आता सदर इसमाला सेवन हिल्स हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. गायिका कनिका हिच्या बेफिकीरीमुळे अनेकांचे प्रान पणाला लगले असल्याची शक्यता आहे. आता पुन्हा अशी चूक व्हायला नको म्हणुन महाराष्ट्र पोलिस खाते आणि प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे.