TATA मध्ये 45 हजार महिलांना नोकरी मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते.

टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे पार्ट बनवले जातात. Apple Inc कडून अधिक व्यवसाय जिंकण्यासाठी कंपनी कडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोनामुळे चीनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अॅप्पलचं उत्पादन थांबलं आहे. त्यामुळे भारताने आयफोनच्या उत्पादनावर भर दिला आहे. सध्या या कारखान्यात 10,000 कामगार काम करतात, त्यापैकी बहुतांश महिला आहेत. आता अजून 45 हजार महिलांना नोकरी देण्यात येणार आहे.

रिपोर्टनुसार, होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना 500 एकरांवर पसरलेला आहे. या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे. मात्र अद्याप टाटा समूह किंवा अॅपलच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या संदर्भात अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.