मोठी बातमी! तब्बल ४५१ भारतीयांना झाली आहे कोरोनाची लागण, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगात आत्तापर्यंत एकुण १ लाख ९४ हजार नागरीकांना कोरोना झाल्याचे समजत आहे. यामध्ये तब्बल ४५१ भारतीयांचा समावेश असल्याचे समजत आहे. चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोना आजाराने आता जगभर फैलाच केला आहे. युरोपातील देशांमध्ये कोरोनाने अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार देशात एकुण १७५ नागरीकांना कोरोना झाला आहे. तर परदेशात कामानिमित्त असणार्‍या एकुण २७६ भारतीयांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या लेखी आकडेवारीनुसार इराणमध्ये २५५ भारतीय कोरोनाबाधित आहेत. यूएईमध्ये १२ आणि इटलीमध्ये ५ भारतीय कोरोनाबाधित आहेत. तर हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकामध्ये प्रत्येकी एक-एक भारतीय कोरोनाबाधित आहेत.

दरम्यान भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५ हजार ७०० नागरिकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. जगभरात कोरोनाने ७ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. तर जगभरात १ लाख ९४ हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा

Leave a Comment