नशेच्या 48 बॉटल जप्त, विक्री करणारे तिघे अटक

औरंगाबाद : शहरात नशेच्या औषधीची विविध ठिकाणहून विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात करण्यात आली आहे. पोलिसी आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाने या प्रकरणात नशेखोरीचा व्यापार करण्याऱ्याकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल 48 औषधीच्या बॉटल जप्त केल्या.

पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून विशेष पथकाने प्रमुख सहायक पोलिस आयुक्त राहुल रोडे यांच्या सोबत अन्न व औषधी विभागाचे निरीशक राजगोपाल बजाज सहपोलिसा अंमलदार शकील सय्यद, इम्रान शेख, विखणकर, आडे खरात, निकम यासोबत महिला अंमलदार प्रियंका सरसांडे आणि कविता यांच्या टीमने रविवारी 27 शहाबाजार भागात एक संशयित व्यक्ती आदिल अहेमदोधीन चाऊस ( रा. शहाबाजार ) याला ताब्यात घेतले. त्यांच्या घरात झाडती घेतली असता तेथे नसेसाठी वापरण्यात येणाऱ्या 17 कोडींग नावाच्या औषधीची बॉटल जप्त करण्यात आल्या.

दरम्यान, त्यातून नशेखोरीच्या बॉटलच्या विक्रीबाबत माहिती पथकाला मिळाली. या आधारे पथकाने हर्षनगर भागात अरबाज गणी देशमुख व शेक सोहेल रा. हर्षनगर या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अरबाज देशमुख त्यांच्या घराची झाडती घेतली असता, त्यांच्या घरातुन 28 नशेच्या वापरण्यात येणाऱ्या बॉटल जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाई एकूण 48 नशेसाठी औषधीच्या बितल्या जप्त करण्यात आले असून या मुद्देमालाची किंमत पाच हजार रुपयांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणात साहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल रिडे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपीच्या विरोधात सिटी चौक पिलोस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.