पेट्रोल-डिझेलवर आणखी ‘भार’! पेट्रोल अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपये अधिभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे.कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी अधिभार लावण्यात येणार आहे. याचा मोठा फटका पेट्रोल, डिझेलला बसण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्र्यांनी कृषी सेस आकरण्याची घोषणा केली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 92.86 आणि डिझेल 83.30 रुपयांना लीटर आहे. यावर हा सेस लागणार नसून तो कंपन्यांच्या ब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर लागणार आहे. यामुळे हा सेस कंपन्यांना द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. या दरवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार नाही असे सांगितले जात आहे.

डिझेलवर 4 रुपये आणि पेट्रोलवर 2.5 रुपयांचा सेस लावण्यात आला आहे. हा सेस ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रमिअम इंधनावर लागणार आहे. याचा अर्थ सरकारने कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like