सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हयातील सातारा शहर हद्दीत सरकारी कामात अडथळा करून सरकारी नोकरास मारहाण करणे व खुनाचा प्रयत्न करणारे, गर्दीत मारामारी करणारे, आदेशाचा भंग करणारे, घरफोडी, चोरी, जबरी चोरी करणारे या प्रकरणी सातारा शहर पोलिस स्टेशन व कोरेगाव पोलिस ठाणे यांनी 5 जणांचा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सहा महीने करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
सातारा पोलिस स्टेशनचे सातारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.आर. मांजरे यांनी जीवन शहाजी रायते (वय-22 वर्षे, टोळी प्रमुख), अभिजीत अशोक भिसे (वय – 20 वर्षे) (दोघेही.रा.दत्तनगर कोडोली- सातारा, ता.जि. सातारा) यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत प्रस्ताव दिला होता.
कोरेगाव तालुक्यातील पोलीस ठाणे नांदगिरी (धुमाळवाडी ) ता.कोरेगावचे हद्दीतील टोळीचा प्रमुख अभिषेक विलास चतुर (वय-24 वर्षे), सौरभ प्रकाश चतुर (वय- 20 वर्षे), सोन्या उर्फ आकाश प्रकाश चतुर (वय-20 वर्षे, सर्व रा.नांदगिरी (धुमाळवाडी) ता.कौरेगाव, जि. सातारा) यांना जिल्हयातुन तडीपार करण्याचा बाबततत्कालीन कोरेगाव पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकारी, रितु खोकर, परिविक्षाधीन I.P.S. यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता.
वरील दोनही टोळीतील 5 इसमांचेवर प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे संशयीत हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याच आदेश देण्यात आला आहे. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्हयाचा पदभार स्विकारले पासून 17 हद्दपार प्रस्तावामध्ये जनतेस उपद्रवी 61 लोकांना सातारा जिल्हा तसेच लगतचे जिल्हयातील तालुक्यांमधून हद्दपरीचे आदेश केलेले आहेत.