‘या’ 5 चुकांमुळे थांबवला जाऊ शकतो ITR Refund !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR Refund : आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. आता करदाते रिफंड मिळण्याची वाट पाहत आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळणाऱ्या रिफंडची लोकं आतुरतेने वाट पाहत असतात.

साधारणपणे 25 ते 60 दिवसांत रिफंड दिला जातो. बर्‍याचदा इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरूनही डिपार्टमेंटकडून रिफंड ( ITR Refund) येत नाही. ज्यामुळे करदात्याला पैसे अडकल्याची काळजी वाटते. मात्र टॅक्स विषयातील तज्ज्ञ आणि सीए असलेले अतुल जैन स्पष्ट सांगतात की, जर तुम्हालाही हीच भीती वाटत असेल किंवा वेळ उलटून गेल्यानंतरही रिफंड मिळाला नसेल तर यामागे मुख्यतः 5 कारणे असू शकतील. चला तर मग कोणत्या चुकांमुळे डिपार्टमेंटकडून रिफंड थांबवला जाऊ शकतो ते जाणून घेउयात …

ITR Filing: Want to get tax refund from ITR directly to your account? Here's what you must do | Itr News – India TV

1- कागदपत्रे न देणे

रिफंड अडकण्यामागे बहुतेकदा हे सर्वात मोठे कारण असते. वास्तविक, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करदात्यांच्या अतिरिक्त माहितीची आवश्यकता असते. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून रिफंडची (ITR Refund) प्रक्रिया सुरु केली जाते. जर तुमचे एखादे डॉक्युमेंट गहाळ झाल्याचे लक्षात आले तर लगेचच तुमच्या मूल्यांकन अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि पावती देखील घ्या.

Haven't received income tax refund yet? Do this | Business News

2- चुकीचा रिफंड क्लेम

अनेक प्रकरणांमध्ये, असे निदर्शनास आले आहे की, करदात्याकडून रिफंड क्लेममध्ये देण्यात आलेली रक्कम ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मूल्यांकनाशी जुळत नाही. त्यामुळे असे झाले तरी रिफंड अडकू शकतो. मात्र, अशा प्रकरणांमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला नोटीस पाठवून कळवेल की तुमच्याकडून रिफंड (ITR Refund) म्हणून मागितलेली रक्कम चुकीची आहे, तर ती रक्कम परत केली जात आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या समाधानासाठी तुम्ही या नोटीसला उत्तर दिल्यास तुम्हाला प्रत्यक्ष रिफंड मिळेल.

Income tax refund status Online in India - How to check it

3- ITR मध्ये चुकीचे तपशील

अनेक वेळा करदात्याकडून ITR मध्ये न जुळणारे किंवा चुकीचे तपशील भरले जातात ज्यामुळे रिफंड (ITR Refund) अडकला जातो. अशा परिस्थितीत दिलेली सर्व माहिती आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेली माहिती यामध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात सामान्य चूक बँक खात्याबाबतची आहे. जर बँक खाते खात्याचे डिटेल्स योग्यपणे भरले नसेल तरीही रिफंड नक्कीच अडकेल.

How To Check Status Of Income Tax Refund Or Filed Income Tax Return (ITR) Online, All Steps

4-कराची देय रक्कम न भरल्याबद्दल

जर तुम्ही कर दायित्वाचे योग्य मूल्यांकन केले नसेल आणि डिपार्टमेंटने मागितलेल्या करापेक्षा कमी रक्कम जमा केली असेल तरीही तुमचा रिफंड (ITR Refund) अडकतो. अशा परिस्थितीतही, डिपार्टमेंटकडून तुम्हाला थकबाकीची नोटीस पाठवली जाते आणि ती भरल्यानंतरच रिफंड दिला जातो. काहीवेळा डिपार्टमेंटकडून तुमचा रिफंड थकित करासह एड्जस्ट केला जातो.

5 reasons why you didn't receive ITR refund and steps to check it

5- बँक खाते किंवा ITR व्हेरिफाय केले नसेल तर

जर तुम्ही ज्यामध्ये रिफंड येणार आहे त्या बँक खात्याला प्री-व्हेरिफाय केलेले नसले तरीही पैसे अडकू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये त्याच्या बँक खात्याचे डिटेल्स भरण्यापूर्वी करदात्याने खाते प्री-व्हेरिफाय केले पाहिजे. याशिवाय, काही करदाते त्यांचे रिटर्न वेळेवर भरतात, परंतु निर्धारित वेळेत आयटीआर व्हेरिफाय नाहीत. या कारणामुळे देखील रिफंड (ITR Refund) अडकू शकतो.

Income Tax dept relief for ITR filing: Who it impacts and what it means - Business News

रिफंड न मिळाल्यास करदात्यांनी काय करावे ???

सर्वकाही बरोबर असूनही रिफंड (ITR Refund) मिळाला नसेल तर सर्वांत आधी बँकेशी संपर्क करा. बर्‍याच वेळा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून रिफंड जारी केला जातो, मात्र बँक ते तुमच्या खात्यात जमा करण्यास उशीर करते. जर इथेही काम झाले नाहीत तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार पाठवू शकता किंवा टोल फ्री नंबरद्वारे रिफंडबाबत विभागाकडून माहिती मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html

हे पण वाचा :

RBI कडून रेपो दरातील सलग तिसऱ्या वाढीनंतर आता पुढे काय होणार ??? अशा प्रकारे समजून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन भाव तपासा

कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ

Airtel च्या ‘या’ 4 प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल एका महिन्याची व्हॅलिडिटी !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षात दिला 700% रिटर्न !!!