1 ऑक्टोबरपासून देशात 5G इंटरनेट सुरू होणार; मोदींच्या हस्ते शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात १ ऑक्टोबर पासून ५ g इंटरनेट सेवेला सुरुवात होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे. 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये फायदा होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ होईल. ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ या आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनात या योजनेचा शुभारंभ होईल.

5G सेवेमध्ये डेटा पाठवण्याचा आणि प्राप्त करण्याचा वेग पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. यामुळे लोकांचा वेळ तर वाचेलच, पण नव्या युगातील अनेक अॅप्लिकेशन्सही सहज वापरता येतील. 5G च्या मदतीने, ग्राहकांचा आता व्यवहारापासून ते फाइल्स डाउनलोड किंवा अपलोड करण्यापर्यंत कमीत कमी वेळ लागेल. 5G दूरसंचार सेवांद्वारे, हाय क्वालिटी चे तसेच मोठमोठे व्हिडिओ किंवा चित्रपट काही सेकंदात मोबाइल आणि इतर डिव्हाईस वर डाउनलोड केले जाऊ शकतात.

जिओ आणि एअरटेलने केली तयारी 

जिओ ने 5G लिलावात सर्वात जास्त बोली लावली आहे. याशिवाय एअरटेलही स्पर्धेत आहे. या दोन दूरसंचार कंपन्यांव्यतिरिक्त, Vi नेही स्पेक्ट्रम विकत घेतला आहे, परंतु कंपनीने सेवा रोलआउटची तारीख उघड केलेली नाही. कंपनीने स्पष्टपणे सांगितले होते की ते ग्राहकांच्या मागणीनुसार 5G सेवा आणतील.

कोणत्या शहरांना मिळणार 5G सेवा?

तर Jio आणि Airtel ची 5G सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. म्हणजेच तुम्हाला त्यांचे प्लॅन्स आणि इतर तपशील दिवाळीपूर्वी मिळतील. सुरुवातीला कंपन्या फक्त मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा आणतील. प्रथम दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे सेवा सुरू केल्या जातील आणि नंतर इतर शहरांमध्ये विस्तारल्या जातील. जिओने आपल्या 5G रोलआउट प्लॅनमध्ये म्हटले आहे की ते पुढील दोन वर्षांत देशभरात 5G सेवा सुरू करतील. तर, 5G योजनांसाठी, ग्राहकांना 4G पेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. परंतु अजून तरी टेलिकॉम कंपन्यांनी 5G रिचार्ज प्लॅन बाबत कोणतीही ठोस माहिती शेअर केलेली नाही.