फक्त गाडीला टेकला म्हणून गाडीच्या मालकाने 6 वर्षांच्या चिमुकल्याला मोठी शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – रस्त्यावर एखादी बाईक किंवा कार असेल आणि तिथं शेजारीच आपण कुणाशी तरी गप्पा मारत असू किंवा उभे असू तर आपण नकळत त्या गाडीला टेकतो. असाच एक चिमुकला रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडीला फक्त टेकला. यामुळे संतप्त झालेल्या कारचालकाने त्याला इतकी मोठी शिक्षा (man kicked 6 year old boy) दिली की तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. या शिक्षेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात हि संतापजनक घटना घडली आहे. कन्नूर जिल्ह्यातील थलासेरी येथील जुन्या तलासरी बसस्थानकाजवळ गुरुवारी रात्री ही घटना घडली. पीडित बालक एका राजस्थानी कुटुंबातील असून, कामानिमित्त तो केरळमध्ये आला होता. पोन्नियम पालम येथील रहिवासी असलेल्या शिहशाद याने रस्त्यावर आपली कार उभी केली होती. कार उभी करुन काही वस्तू घेण्यासाठी तो दुकानात गेला होता. खेरदी करुन तो परत आला तेव्हा त्याच्या गाडीजवळ एक मुलगा उभा होता. यानंतर आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने त्या मुलाला जोरदार लाथ (man kicked 6 year old boy) मारली. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

केरळमधील भाजप नेते के. सुरेंद्रन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागानेही या प्रकरणाची दखल (man kicked 6 year old boy) घेतली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत आरोपीवर कलम 308, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक .करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!