“6G तंत्रज्ञान 2023 च्या अखेरीस किंवा 2024 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता” – अश्विनी वैष्णव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 6G तंत्रज्ञानाच्या बाबतीत, भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला देशात 6G तंत्रज्ञान सुरू करण्याचे लक्ष्य असल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 6G तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू आहे. आपण ते आपल्याच देशात तयार करू.

“या तंत्रज्ञानाबाबत जी काही आवश्यक उपकरणे असतील, ती भारतातच तयार केली जातील,”असेही ते म्हणाले. “ते 2023 किंवा 2024 मध्ये पाहता येईल. भारतात हे तंत्रज्ञान सुरू केल्यानंतर आम्ही ते जगभर वितरित करू,”असेही दळणवळण मंत्री म्हणाले. 4G, 5G च्या बाबतीत इंटरनेट जगताच्या विकासाचा वेग ज्या प्रकारे बदलला आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की, 6G च्या आगमनाने पुन्हा एकदा इंटरनेट जगतात मोठा बदल होणार आहे.

6G तंत्रज्ञानाच्या विकासावर काम सुरू
केंद्रीय मंत्री म्हणाले, “6G तंत्रज्ञानाच्या विकासावर आधीच काम सुरू झाले आहे. आम्ही टेलिकॉम सॉफ्टवेअर, इंडिया मेड टेलिकॉम इक्विपमेंट हे भारतात नेटवर्क चालवण्यासाठी डिझाइन केले आहे ज्याचे जागतिकीकरण केले जाऊ शकते.”

फायनान्शिअल टाईम्स आणि द इंडियन एक्स्प्रेस यांनी आयोजित केलेल्या ‘न्यू टेक्नॉलॉजी अँड द ग्रीन इकॉनॉमी: टू ट्रेंड्स शेपिंग अ न्यू इंडिया’ या ऑनलाइन, अजेंडा-सेटिंग वेबिनारच्या चौथ्या मालिकेत बोलताना वैष्णव म्हणाले की,”या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या याआधीच देण्यात आल्या आहेत. आमचे शास्त्रज्ञ आणि अभियंते या तंत्रज्ञानावर जोमाने काम करत आहेत.”

स्वदेशी 5G लाँच करण्याची तयारी
ते म्हणाले की,”केवळ 6G तंत्रज्ञानावरच काम केले जात नाही आहे तर भारत स्वत: स्वदेशी 5G लाँच करण्याच्या तयारीत देखील आहे.””पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाऊ शकते,”असेही केंद्रीय मंत्री म्हणाले. यासाठी TRAI शी संपर्क साधण्यात आला आहे. TRAI यासाठी सूचना घेत आहे, जे पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.

Leave a Comment