सातारा जिल्ह्यात नवे 723 पाॅझिटीव्ह, तर कराड तालुक्यात 13 दिवसात 3 हजार 649 कोरोना बाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 723  नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 676 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 238 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.43 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 773 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 5 हजार 150 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 91 हजार 153 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 940 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 23 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कराड तालुक्यात 13 दिवसात 3 हजार 649 बाधित

कराड तालुक्यात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर बाधित आढळून आले आहेत. गेल्या 13 दिवसातील बाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- 316, 147,217, 259, 350, 327, 382, 323, 184, 243, 303, 259, 339 असे एकूण 3 हजार 649 एवढे कोरोना पाॅझिटीव्ह वाढले आहेत. सातारा जिल्ह्यात गेल्या 13 दिवसात सर्वात आघाडीवर तालुका हा कराड राहिलेला आहे.

Leave a Comment