Tuesday, January 31, 2023

7th Pay commission : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने DA सहित जाहीर केल्या ‘या’ 5 मोठ्या घोषणा

- Advertisement -

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employee’s) चांगली बातमी येत आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांना (Pensioners) दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. याचा फायदा सुमारे 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना होईल. या घोषणांमध्ये महागाई भत्ता म्हणजेच डीए (DA), महागाई मदत म्हणजे डीआर (DR) यासारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे.

1. DA आणि DR- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राज्यसभेत म्हणाले होते की,” सातव्या वेतन आयोगानुसार जुलैपासून DA आणि DR केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू लागतील. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही नवीन घोषणा केलेली नाही. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमने असा दावा केला आहे की, सप्टेंबर महिन्यापासून पगारामध्ये DA आणि DR मिळू शकतील.

- Advertisement -

2. हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (HBA) – सरकारकडून हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स अर्थात HBA बाबत एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने HBA चा व्याज दर 7.9 टक्क्यांवर आणला होता. हे दर 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहतील.

3. ट्रॅव्हलिंग अलाउन्स (TA) – रिटायर झालेल्या कर्मचार्‍यांना आता 180 ​​दिवसांत त्यांचा TA चा तपशील सादर करावा लागेल. पूर्वी ही मर्यादा 60 दिवसांची होती. हा नवीन नियम 15 जूनपासून अंमलात आला आहे.

4. पेन्शन स्लिप, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप आणि SMS द्वारे उपलब्ध होईल- केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांना यापुढे पेन्शन स्लिपसाठी बँकांमध्ये जावे लागणार नाही. केंद्र सरकारने पेन्शन जारी करणार्‍या बँकांना पेन्शनधारकांची पेन्शन स्लिप त्यांचे ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप आणि SMS द्वारे पाठविण्यास सांगितले आहे. हा नवीन नियम 1 जुलैपासून लागू झाला आहे.

5. पेन्शन- कुटुंब पेन्शनच्या नवीन नियमांनुसार आता मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्याबरोबरच पेन्शनची सुविधा सुरू होईल. त्यानंतरच्या औपचारिकता नंतर देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group