नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंग पासवर्ड मजबूत करण्याचे 8 मार्ग, बँकिंग फसवणूक कशी टाळावी ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वेगाने डिजीटल होत असलेल्या जगात ऑनलाइन फसवणूकही त्याच वेगाने वाढते आहे. कोरोना महामारीमुळे बँकिंग फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली आहे. या वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लोकांना सांगितले आहे की,” नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा.”

काही खास पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग करू शकता. हे आपल्याला ऑनलाइन फसवणूक टाळण्यास मदत करेल. स्ट्रॉंग पासवर्डसह, तुम्ही तुमचे पैसे आणि माहितीचे काही प्रमाणात संरक्षण करू शकता.

अशा प्रकारे पासवर्ड स्ट्रॉंग बनवता येतो
पासवर्ड दोन्ही Uppercase आणि Lowercase चे कॉम्बिनेशन असावे. जसे कि – aBjsE7uG.
पासवर्डमध्ये नंबर्स आणि सिम्बॉल दोन्ही वापरा. जसे कि – AbjsE7uG61!
तुमच्या पासवर्डमध्ये किमान 8 अक्षरे असली पाहिजेत. जसे कि – aBjsE7uG
Itislocked आणि thisismypassword सारखे कॉमन शब्द वापरू नका.
‘Qwerty’ किंवा ‘asdfg’ सारखे कीबोर्ड पथ वापरले जाऊ नयेत. त्याऐवजी “:)”, “:/’वापरा.
12345678 किंवा abcdefg सारखे कॉमन पासवर्ड तयार करू नका.
अंदाज लावण्यास सोपे पर्याय वापरू नका. उदा-DOORBELL-DOOR8377
तुमच्या नावाचा आणि जन्मतारखेचा पासवर्ड लिंक करू नका. जसे कि – रमेश@1967.

हा हेल्पलाईन क्रमांक आहे
गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने 155260 हेल्पलाईन सुरू केली आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीला बळी पडला असाल तर या क्रमांकावर त्वरित कॉल करा. हा हेल्पलाईन क्रमांक दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 24×7 उपलब्ध आहे. इतर राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ते सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध आहे.

हे सायबर पोर्टल आहे
ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या सायबर पोर्टल https://cybercrime.gov.in/ सह 155260 पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आला होता परंतु आता तो पूर्णपणे सुरू करण्यात आला आहे. हे भारतीय सायबर क्राईम को-ऑर्डिनेशनचे असे प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा पहिला युझर्स दिल्ली बनला आहे.

या प्लॅटफॉर्मवरून लोकांना मदत मिळते
सुमारे 55 बँका, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवे आणि इतर संस्थांकडे ‘सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टीम’ नावाचे इंटरकनेक्ट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना खूप कमी वेळात मदत केली जाऊ शकते.

Leave a Comment