Thursday, March 30, 2023

वडिलांनी 80 व्या वर्षी वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवल्याने मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका मुलाने आपल्या जन्मदात्याची गळा चिरून हत्या केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या वृद्ध वडिलांनी 80 व्या वर्षी लग्न करण्याच्या हेतूनं वधू वर सुचक मंडळात आपले नाव नोंदवले होते. याचा राग आल्याने मुलाने आपल्या बापाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली.

हाती आलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने याबत जर समाजात समजले तर आपला अपमान होईल. तसेच प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार होईल यामुळे रागाच्या भरात आरोपी मुलाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. त्याने कांदा कापण्याच्या सुरीने आपल्या वडिलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला पण बोथट सुरीने गळा कापेना म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांचा खून केला. यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

हि घटना गुरुवारी संध्याकाळी खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरामध्ये घडली. मृत वडिलांचे नाव शंकर रामभाऊ बोऱ्हाडे असे होते तर आरोपी मुलाचे नाव शेखर शंकर बोऱ्हाडे असे आहे. माझे वडील शंकर रामभाऊ बोऱ्हाडे यांनी परस्पर वधू -वर सुचक मंडळात पैसे भरून स्वतःच्या लग्नाची नोंदणी केली. नोंदणी करुनही ते माझ्याशी खोटं बोलले. याचा राग आल्याने त्याने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली असल्याचे आरोपी शेखर याने आपल्या जबाबात म्हंटले आहे. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.