सातारा जिल्ह्यात रूग्णसंख्या स्थिरच : नवे 829 कोरोना पाॅझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 829 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 980 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 333 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 83 हजार 757 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 70 हजार 576 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 120 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 26 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 11 हजार 788 जणांचे नमुने घेण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रूग्णसंख्या स्थिरच आहे. या रूग्णसंख्येत कमी होण्यासाठी आरोग्य प्रयत्नशील आहे. तरीही कुठेतरी कमी होत नसल्याने लाॅकडाऊनचे नियमही शिथिलता देण्याविषयी निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

Leave a Comment