927 विद्यार्थ्यांची भौतिकशास्त्राच्या पेपरला दांडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काल सकाळी साडेदहा ते 2 या वेळेत बारावी भौतिकशास्त्र व तर्कशास्त्राचा पेपर घेण्यात आला. या वर्षी काठिण्य पातळी कमी असल्याचे शिक्षकांचे व पेपर सोपा गेला असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. एकूण 29 हजार 741 विद्यार्थ्यांपैकी 927 विद्यार्थी गैरहजर होते. 28 हजार 814 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अवघड विषय म्हणून भौतिकशास्त्राचे नाव घेतले जाते.

कोरोनामुळे प्रत्यक्ष शिक्षणासाठी न मिळालेला पुरेसा वेळ आणि एकंदर परिस्थितीत फिजिक्सचा पेपर कडे लक्ष लागले होते. मात्र कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम, लेखी परीक्षेसाठी वाढवून मिळाला वेळ आणि 40 टक्के अभ्यासक्रमावर झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षेने विद्यार्थ्यांना परीक्षा पास होण्याबद्दल चिंता दिसून आली नाही.

तणावमुक्त वातावरणात झालेल्या पेपर नंतर पेपर सोपा, चांगला गेल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. तर सलग चौथ्या पेपरला एकही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे बोर्डाचे सचिव आर.पी. पाटील यांनी कळवले. हिंगोली जिल्ह्यात फक्त एका गैरप्रकाराची प्रकरण नोंद झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment