टीना दाबी या २०१५ सालच्या UPSC टॉपर आहेत. अथर खान यांच्यासोबत प्रेमविवाह केल्यानंतर त्या चर्चेत आल्या.
टिना या त्यांच्या बॅचच्या सर्वात तरुण IAS अधिकारी होत्या. अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्लिअर करून त्या दलित समाजातील पहिल्या महिला IAS बनल्या.
मध्यंतरीच्या काळात टीना यांनी अथर यांच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर त्या सोशल मीडियापासूनही दूर होत्या.
IAS टीना डबी यांनी दुसरे लग्न केले आहे. टीना या आता महाराष्ट्राच्या सून झाल्या आहेत. मूळच्या लातूरच्या असणाऱ्या IAS प्रदीप गावंडे यांच्यासोबत टिनाने लग्न केले आहे.
जयपूर येथे झालेल्या विवाहाचे फोटो आता समोर आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्ष ठेऊन दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
टिना डबी या त्यांच्या इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय राहतात. मात्र अथर यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता त्यांनी आपले अकाउंट बंद केले आहे. त्यांना १० लाखांहून अधिक फॉलोअर्स होते
टिना दाबी यांच्या लग्नाचे फोटो पाहून त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत.