केळ्यामध्ये भरपूर फायबर्स असतात. त्यात विघटनशील आणि अविघटनशील असे दोन्ही प्रकार असतात.
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे केळं खाण्यामुळे शरीराला पुरेसे मिनरल्स मिळतात.
केळं हे एक अप्रतिम फळ आहे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट तर आहेतच शिवाय पुरेश्या प्रमाणात साखरही आहे.
केळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढतं अशी एक समज आहे. मात्र जर तुम्ही केळी अती प्रमाणात खाल्ली तरच तुमचे वजन वाढतं.
केळ्यातील पोटॅशिअम तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवते. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यावर होतो.
एका मध्यम आकाराच्या केळ्यामधून तुम्हाला कमीत कमी १४ टक्के मॅगनिज मिळत असते.