आल्याचे सेवन करणे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यास सहाय्यक ठरते.
यामध्ये जळजळ, मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव, गोठण्याची प्रक्रिया, वाढलेला रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता आहे.
आल्याचा रस लिपिड नियंत्रित करण्यास तसेच वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो.
आल्यातील दाहक-विरोधी म्हणजेच दाह कमी करणारे गुणधर्म आणि वेदनशामक गुणधर्म दोन्हीही संधिवातावर प्रभावी आहेत.
आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म स्नायूंचा ताण आणि तणाव दूर करण्यासाठी मदत करतात.
आल्याचा वापर नियंत्रित प्रमाणात नियमित केल्यास झपाट्याने वाढणारे वा वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
आल्याचा वापर कर्करोगासारख्या भयंकर रोगास प्रतिबंध करू शकतो.