ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलगी जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | उसाच्या ट्रॅक्टर खाली सापडून एक मुलगी जागीच ठार आहे. सांगलीतल्या हरिपूर रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये अन्वेशा विसपुते (वय- 12 वर्ष) ही मुलगी मृत पावली आहेत. क्रिकेट खेळून घरी परतत असताना हा अपघात घडला आहे.

सांगली शहरातल्या हरिपूररोड या ठिकाणी उसाच्या ट्रॉलीखाली सापडून 12 वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अन्वेशा विसपुते असे या मुलीचं नाव आहे. पाटणे प्लॉट याठिकाणी अन्वेशा विसपुते ही राहते आणि घरातून ती क्रिकेट खेळण्यासाठी गेली होती.  क्रिकेट खेळून सायकलवरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या मागील असणाऱ्या ट्रॉलीखालील चाकाखाली अन्वेशा ही तोल गेल्याने पडली. त्यामुळे तिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली.

घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. घटनास्थळी नागरिकांना मोठी गर्दी केली होती. 12 वर्षाच्या मुलीच्या दुर्देवी मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment