वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून 22 वर्षीय मुलाने केली सावत्र आईची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून एका मुलानं आपल्या सावत्र आईची हत्या (Murder) केली आहे. यानंतर हा आरोपी मुलगा फरार झाला होता. मागच्या तीन आठवड्यांपासून पोलीस या आरोपी मुलाचा शोध घेत होते. अखेर या आरोपी मुलाला अटक करण्यात भोर पोलिसांना यश आले. त्यांनी त्याला दिल्लीमधून अटक केली आहे. शिवम अंकुश शिंदे असे या आरोपी मुलाचे नाव आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अकुंश शिंदे यांनी दुसरं लग्न होतं. याचा राग आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने आपल्या सावत्र आईची हत्या (Murder) केली. या हत्येप्रकरणी (Murder) त्याच्यावर भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशा प्रकारे केला खून
22 वर्षीय आरोपी शिवम शिंदे हा कामानिमित्त पुण्यातील कात्रज येथे राहत होता. गुन्हा घडला त्या दिवशी तो वडिलांच्या घरी भोर येथे आला होता. आरोपी शिवम शिंदे याच्या वडिलांनी शिवमच्या आईच्या मृत्यूनंतर रेश्मा शिंदे ह्यांच्याशी विवाह केला होता. त्यामुळे शिवमच्या मनात मोठ्या प्रमाणात राग होता. यानंतर आरोपीने वडील रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत पहाटे सावत्र आई रेश्मा अंकुश शिंदे ह्यांचा झोपेत असताना गळा चिरला आणि नंतर दगडी वरवंटा डोक्यात घालून त्यांचा खून (Murder) केला. खून झाला त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

23 दिवसांपासून पोलिसांना देत होता चकमा
सावत्र आई रेश्मा शिंदेचा खून केल्यानंतर शिवम हा कोल्हापूर, आंध्रप्रदेश,तिरुपती, तेलंगणा, ओडिसा, मुंबई, मध्यप्रदेश, हरियाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिला होता. गेल्या 23 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. यानंतर तो गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतल्या एका मिठाईच्या दुकानात पार्सल पोहचवण्याचं कामं करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. यानंतर या माहितीच्या आधारे भोर पोलिसांनी दिल्लीत जाऊन आरोपीला अटक (Murder) केली आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक शेळके, विकास लगस, अजय साळुंखे, दत्तात्रय खेंगरे, चेतन पाटील, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके यांच्याकडून हि कारवाई करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे देण्यात आले संघाचे कर्णधारपद