अजबगजब ! सावत्र मुलापासून गेले दिवस, केले त्याच्याशीच लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असं म्हणतात कि युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. प्रेम म्हणजे प्रेम असं तुमचं आमचं सगळं सेम असतं पण याचं म्हणीला तडा देणार एक परम प्रकरण रशियाची राजधानी मॉस्कोतून समोर आलेले आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होती आहे. इथे एका आईचा आपल्याच सावत्र मुलावर जीव जडला आणि इतकेच तर तिला त्या मुलापासून दिवसही गेलेत. आता दिवस गेल्यानंतर हे दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत.

सध्या या दोघांच्या प्रेमाची आणि लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यातील मुलाचे व्लामदिमीर असून त्याचे वय २० वर्ष आहे. तर, ३५ वर्षीय मरिना ही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. या मरिनाचे लग्न हे व्लामदिमीरचे वडील अलेक्स यांच्याशी झालेले होते. त्यावेळी अलेक्स यांचा मुलगा व्लादिमीर हा अवघ्या सात वर्षांचा होता. तर त्यावेळेस मरिनाचे वय हे २२ वर्ष होते. काही वर्षांपूर्वी अलेक्स आणि मरिना यांचा घटस्फोट झाला होता. आता मरिना ही ३५ वर्षांची झाली असून व्लादिमीर हा २० वर्षांचा आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे. मरिना ही मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून प्रसिद्ध आहे.


View this post on Instagram

 

Принимаем поздравления и лайки🙂 Не дотерпели вы до вечера и завалили директ. Видео обычное. По делам покатались и заехали в Загс 😅 Расчески не было. Кольца в машине. Зато было хорошее настроение и смущение. Мы очень какие-то лунтики на видео. Но вот так. Главное для меня не как, а за кого и с кем 🙂❤️ Вечером постараюсь залить фото в платье. Объявляю нас мужем и женой😅( мы хотели немного наряднее😅, но уже вечером)

A post shared by Марина Балмашева (@marina_balmasheva) on Jul 11, 2020 at 2:14am PDT

अलेक्स आणि मरिना यांच्यातील घटस्फोटाचे कारण व्लादिमीर हा असल्याचे वृत्त तेथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. मरिना आणि व्लादिमीर यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण अलेक्सीला आधीच लागली होती. त्यानंतर त्या दोघांना एकांतात पाहिल्यानंतर अलेक्सीने मरिनाला काही वर्षापूर्वीच घटस्फोट दिला. मरिना सध्या गरोदर असून काही महिन्यातच व्लादिमीर आणि मरिना एका बाळाचे पालक होणार आहेत. मरिनाने रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.