थायलंडच्या राजघराण्याचा अपमान केल्या प्रकरणी 65 वर्षांच्या महिलेला मिळाली आतापर्यंतची सर्वात कठोर शिक्षा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थायलंड । थायलंड (Thailand) मधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 65 वर्षांच्या महिलेला राजघराण्याचा (Monarchy) सोशल मीडियावर अपमान केल्याबद्दल मंगळवारी येथील कोर्टाने 43 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. थायलंडमधील कोणत्याही व्यक्तीला राजाचा अपमान केल्याबद्दल आजपर्यंत देण्यात आलेली ही सर्वात कठोर शिक्षा असल्याचे या महिलेच्या वकिलाने सांगितले.

एंचान प्रीलर्ट (Anchan Preelert) नावाच्या या महिलेला अशा वेळी शिक्षा सुनावली गेली आहे जेव्हा अभूतपूर्व युवा-नेतृत्त्वाखाली निदर्शने सुरू आहेत, ज्यामध्ये निषेध करणारे नेते राजावर उघडपणे टीका करीत आहेत. या टीकेमुळे त्यांच्यावर लेसे मॅजेस्टे या कायद्यांतर्गत कारवाई देखील होऊ शकते, ज्यामध्ये त्यांना 15 वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

29 वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एंचान प्रीलर्टला या कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यातील सर्वात गंभीर म्हणजे 2014-2015 मध्ये यूट्यूब आणि फेसबुकवर राजघराण्याविरूद्ध व्हिडिओ पोस्ट करणे हा आहे. यापूर्वी कोर्टाने तिला 87 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती, परंतु तिने आपले गुन्हे कबूल केले, त्यानंतर त्यांची शिक्षा अर्ध्यावर करण्यात आली, असे एंचानच्या वकिलांनी सांगितले. या महिलेच्या वकिलाने सांगितले की, लेसे मॅजेस्टे प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात कठीण शिक्षा आहे. वरच्या दोन न्यायालयात तिच्या खटल्याला ती आव्हान देऊ शकण्याची एक शक्यता आहे.

2014 मध्ये लोकांचे सरकार पडून सैन्याने सत्तांतर केले. त्यानंतर काही वेळातच, जानेवारी 2015 मध्ये सुरक्षा दलांनी एंचानच्या घरावर छापा घातला. तिचे हे प्रकरण पहिले लष्करी न्यायालयात आणले गेले होते परंतु 2019 मध्ये हे प्रकरण दिवाणी न्यायालयात वर्ग करण्यात आले. 2014 च्या सत्तांतरानंतर लेसे मॅजेस्टे प्रकरणात 169 जणांवर खटले दाखल करण्यात आले.

सोमवारी आणखी एका व्यक्तीलाही 4 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, याला 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. त्या व्यक्तीने राजाविरूद्ध काही कविता आणि लेख प्रकाशित केल्याचा आरोप आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment