अबब !! 9 वर्षांचा हा मुलगा वर्षाला कमावतो तब्बल 217 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण युट्युब, ब्लॉग यांसह इतर माध्यमातून कमी करत असतो. ज्याला डिजिटल माध्यमी हाताळण्याची सवय आहे तो पैसे कमवतोच मग त्या व्यक्तीचे वय कमी असले तरी. फोर्सब्सने नुकतीच ‘२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स’ अशी यादीच जाहीर केली. त्यामध्ये ९ वर्षाचा एक चिमुकला असून तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर ठरला आहे. त्याने २०२० या वर्षात तब्बल २१७ कोटी रुपये कमावले असून रायन काजी असे त्याचे नाव आहे.

फोर्सब्सच्या या यादीमध्ये सलग तिसऱ्यांदा रायन अव्वल स्थानी आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार रायनने त्याच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी २९.५ मिलियन डॉलर म्हणजेच २१७ कोटी रुपये कमावले आहेत.

रायन्स वर्ल्ड असं रायनच्या युट्यूब चॅनेलचे नाव आहे. या चॅनेलवर तो खेळणी आणि गेम्सचे रिव्ह्यू पोस्ट करत असतो. याशिवाय रायनने २०० मिलियन डॉलर्स म्हणझेच एक हजार १४७२ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई या चॅनेलच्या नावाने असणारी खेळणी आणि कपड्यांच्या व्यवसायातून केली आहे. रायनच्या नावाने आता एक टॉय आणि क्लोथिंग ब्रॅण्ड आहे.

मार्च २०१५ साली रायनचं पहिलं युट्यूब चॅनेल सुरु केलं. तेव्हापासून आतापर्यंत रायनच्या या चॅनेलचे दोन कोटी ७६ लाख फॉलोअर्स झाले आहेत.रायन हा मागील अनेक वर्षांपासून सर्वाधिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर आहे. टॉय रिव्ह्यूजच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारा रायन लवकरच त्याच्या एका टीव्ही शोमध्ये दिसणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment