शंभर वर्षांपूर्वीच्या कबरीतून डोकावताना दिसून आली एक आश्चर्यकारक गोष्ट, पाहताच एका व्यक्तीने मारली किंकाळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अचानक अशी घटना घडते, ज्याची तो कधीच अपेक्षा करत नाही. या घटना थेट दुसऱ्या जगाशी संबंधित आहेत. भूत आहेत की नाहीत याबद्दल जरी वाद असला तरी अनेक लोकं असेही मानतात की, दुसरे जग आहे. सोशल मीडियावर, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने अशीच एक Paranormal Activity पुराव्यासह शेअर केली.

37 वर्षीय जोएलने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटले. या व्हिडिओमध्ये, त्या माणसाने शंभर वर्षांपूर्वीच्या एका कबरीचे रेकॉर्डिंग केले आहे. या कबरीतून मानवी केस बाहेर आलेले दिसत होते. शंभर वर्षांपूर्वीच्या या कबरीतून मानवी केस बाहेर पडताना पाहून ती व्यक्ती किंचाळली. असे कसे होऊ शकते हे त्याला समजू शकलेले नाही आणि जर केस आधीच कबरीबाहेर होते, तर गेल्या शंभर वर्षात इतर कोणालाही ते कसे लक्षात आले नाही?

ज्या कबरीतून केसं बाहेर आले होते ती सिमेंटची होती. त्या माणसाने त्याच्या कबरीमध्ये असलेल्या क्रॅककडे लक्ष वेधले. या क्रॅकमधून केस बाहेर आले होते. हे पाहून माणूस किंचाळला. व्हिडिओमध्ये त्या माणसाचा आवाज थरथरत होता. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला, ते रोमांचित झाले. मात्र, याबरोबरच काही लोकांनी असेही लिहिले की, ते मानवी केस नाहीत. कदाचित कबरीजवळ एक झाड असेल, ज्याची मुळे बाहेर फेकली गेली असतील.

त्याच वेळी, जोएलने व्हिडिओबद्दल सांगितले की,” त्याने नंतर ही गोष्ट जवळूनही पाहिली. ते खरोखरच मानवी केस होते. त्याला असे वाटते की,एखाद्या खारीने त्यातील मृत शरीराचे केस कबरीतून बाहेर काढले असावेत.” सर्वात भयानक गोष्ट अशी आहे की, जोएल दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथे परत गेला तेव्हा त्याला आढळले की केस कबरेच्या आत पुरले गेले आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा शेअरही करण्यात आला होता.

Leave a Comment