कराड तालुक्यात घरफोडी करुन 10 तोळे सोने लंपास करणारा पुण्यात सापडला; 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बनवडी ता. कराड येथे घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. असद फिरोज जमादार (रा.भाजी मंडई गुरूवार पेठ,कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनवडी ता. कराड येथे मागील काही दिवसापूर्वी 1 घरफोडी चा गुन्हा घडला होता. यात चोरट्याने घरातील रोख रक्कम व दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याबाबत पोलिसांनी फरार असलेल्या संशयिताचा शोध सुरू केला. अखेर तांत्रिक बाबी व खबऱ्याच्या माहितीनुसार संबंधित संशयित महंमदवाडी पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून असद जमादार याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून गुन्हयातील सोन्याचे दागिने,एक स्पोर्टस बाईक, महागडा मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे सात लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कराड शहर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, सपोनि अमित बाबर, पो.कॉ धिरज कोरडे, प्रफुल्ल गाडे, समीर वाघमळे, पो.ना सचिन निकम यांनी या कारवाईत भाग घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment