गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी चौंडी येथे प्रक्षोभक भाषण केले. या प्रकरणात आता पडळकर यांच्या विरोधात कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी एका कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेत चौंडी येथे जाण्यास निघाले असताना त्यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. यानंतर त्यांनी चौंडी येथे धनगर समाजाबाबत काही प्रक्षोभक भाषण केले. यावरून धनगर समाजातील काही संघटनांनी पडळकर यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात दिली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौंडी काल अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी पडळकर व समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्याचा प्रकार घडला. दरम्यान यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जहरी टीका केली होती. तसेच धनगर समाजाबाबतही काही वक्तव्ये केली होती. यानंतर आता अधनगर समाजातील काही संघटनांनीच पडळकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

Leave a Comment