वणवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

रेनावळे (ता. वाई) येथील वनक्षेत्रास वणवा लागण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणवा लावल्याप्रकरणी रंगेहाथ पकडल्यानंतर संबधितांना कोर्टात हजर केल्यानंतर प्रत्येकी 5 हजार रूपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला.

वनविभागाकडून मिळेलेली माहीती अशी, मौजे रेनावळे येथे राखीव वनक्षेत्रास 26 फेबु्रवारी 2020 रोजी जिल्हा परिषद शाळा परिसरात कचरा व कागद जाळण्यासाठी शिवाजी लक्ष्मण पारटे (रा. वेलंग, ता. वाई) व निलिमा गणेश खरात (सध्या, रा. रेनावळे, ता. वाई) आग लावली होती. सदरच्या कचर्‍यातील कागद व पालापाचोळा हा वार्‍याने उडून शेजारील क्षेत्रात जावून तेथील गवताने मोठा पेट घेतला. रेनावळे गावच्या वनक्षेत्रात दुपारी 1 च्या सुमारास आग लागली. सदरची आग वनअधिकारी व वनकर्मचारी यांना विझविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत वनक्षेत्रातील 22 हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे 11 हजार रूपयाचे नुकसान झाले. सदर आरोपीवर भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (1),(ब),(फ) अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात 13 मार्च 2021 रोजी आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते.

सदर आरोपींनी 20 मार्च 2021 रोजी वणव्याबाबतची कबुली दिली. न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 5 हजार रूपये दंड व ते न भरल्यास 20 दिवसांची साधी कैद शिक्षा सुनावली. उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक श्री. भडाळे, श्री. गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब कदम, रत्नाकर शिंदे, संदिप पवार, वनरक्षक प्रदिप जोशी यांनी तपासाचे काम पाहिले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment