Wednesday, February 8, 2023

घाटी रुग्णालयातील व्हेंटीलेटर्स तपासण्यासाठी दिल्लीहून तज्ज्ञांची समिती शहरात

- Advertisement -

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील खराब व्हेंटिलेटर्सची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून केंद्र शासनाच्या वतीने डाॅ. राम मनोहर लोहिया आणि सफदरजंग रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डाॅक्टर्स शहरात येत आहेत. अशी माहिती केंद्रशासनाचे असिस्टंट साॅलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांच्या खंडपीठाला बुधवारी दिली. आता ठाम भूमिका घ्यायलाच हवी. रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकेल, असे वेंटिलेटर वापरण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.

गेल्या 29 मे रोजी घाटी रुग्णालयातील खराब व्हेंटिलेटर्स संदर्भात एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमधे व्हेंटीलेटर्सचा वापर करणारे 21 जणांचे पथक व व्हेंटिलेटर्स मॅनिफॅक्चरर्स यांची चर्चा झाली.या चर्चेत एच.एल.एल. सीडीएससीओ, डीजीएससी, एआयएमएमएस,नागपूर आणि अन्य दोन मॅनिफॅक्चरर्सचा समावेश होता.त्याचा अहवाल राज्य शासनाच्यावतीने खंडपीठाला सादर केलेला आहे.

- Advertisement -

केंद्राने राज्यांना व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केल्यानंतर त्यामधे बरेच व्हेंटिलेटर्स खराब निघाले होते. या संदर्भात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत केंद्रशासनाकडून वरील खुलासा झाला. बोलतांना केंद्रशासनाचे वकील सिंग यांनी खंडपीठात आणखी खुलासा केला की, शहरात उद्या येत असलेली तज्ज्ञ समिती व्हेंटिलेटर्स तपासल्यानंतर जर ते योग्य पध्दतीने दुरुस्त होणार असतील तर दुरुस्त केले जातील व जर बदलावे लागले तर वाॅरंटी पिरीयडसच्या नियमानुसार बदलून दिले जातील. कोव्हिडच्या प्रत्येक रुग्णाला पूर्ण बरे करण्याचा निश्र्चय केंद्रशासनाने केलेला आहे. त्यानुसार दोन डाॅक्टरांची समिती अहवाल देईलयेत्या 7 जून पर्यंत याचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येईल.

जनहित याचिकेच्या रुग्णवाहिकेच्या मूद्यावर खंडपीठाने आदेश दिले आहेत की, परिवहन विभागाने रुग्णवाहिकांना परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेले रुग्णवाहिकेचे वेळेची मर्यादा असलेले दरपत्रक प्रत्येक रुग्णवाहिकेवर चिटकवलेले असायला हवे.