औरंगाबाद | वाळूज भागात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याला चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी भागात घडली आहे. निकिता मनोहर पारखे ( वय 20) लग्न किरण खंडाळे (रा. घाणेवाडी तालुका बदनापुर) यांच्यासोबत झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर निकिता ही किरणला सोडून माहेरी आली.
काही दिवसानंतर निकिता ही भंगार व्यवसायिक अर्जुन राजपूत याच्यासोबत लिव इन मध्ये गावात राहत होती. शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास निकिता आईची आई उषाबाई पाखरे, मामा भारत बनकर, सासु गंगुबाई खंडाळे व सचिन खंडाळे हे चौघे निकिताच्या घरी गेले. आणि निकिताला समजावून सांगितले की अर्जुन सोबत राहू नको निकिता व अर्जुन या दोघांसोबत या चौघांनी वादावादी सुरू केली आणि या दोघांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत निकिता व अर्जुन राजपूत हे दोघेही गंभीर झाले आहेत. या प्रकरणी नीता पारखे आईच्या तक्रारीवरून उषाबाई पारखे, भारत बंनकर, गंगुबाई खंडाळे व सचिन खंडाळे या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक काकासाहेब जगदाळे हे करत आहे.