वनविभागाच्या फिरत्या पथकाने हस्ती दंत विकणारी टोळी पकडली; इनोव्हा गाडी, तीन मोबाईल, तीन हस्ती दंत जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्डजवळ हस्ती दंत घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोल्हापूर व सातारा वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथकाने कारवाई केली. यावेळी तीन आरोपींच्या कडून एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH09 AQ 6661), तीन मोबाईल, हस्ती दंत 3 नग (वजन 965 ग्राम ) असे सर्व जप्त करण्यात आले.

या कारवाईत माणिक विलासराव इनामदार (वय-59 परळी निनाई, ता. शाहूवाडी), सागर आबासाहेब साबळे (वय-32 माले ता. पन्हाळा), धनंजय केरबा जगदाळे (वय-21 शिंगणापूर ता. करवीर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोल्हापूर वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथक वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनक्षेत्रपाल फिरते पथक सातारा सचिन डोंबळे,वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले,वाहन चालक दिनेश नेहरकर, पोलिस कॉन्स्टेबल सुहास पवार यांचा कारवाईत सहभाग होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment