राष्ट्रीय महामार्गावरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड, पोलिसांकडून 1 लाख 28 हजारांचे साहित्य जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महार्गाचे काम सुरू असून ते काम दिलीप बिल्डकॉन कंपनी मार्फत सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणार्‍या लोखंडी अँगल, पत्रे तसेच रस्ते कामासाठी लागणार्‍या इतर साहित्याची चोरी होत होती. मिरजेतील गुन्हे प्रकटीकरण पथकांनी छापा टाकून चौघांना अटक करून 1 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांना अटक केली आहे तर एक फरारी आहे.

रत्नागिरी -नागपूर हा राष्ट्रीय महामार्गा मिरजेतून गेला असून त्या राष्ट्रीय महामार्गाचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनी करीत आहेत. रस्त्याच्या कामासाठी मोठमोठे लोखंडी अँगल, पत्रे, तसेच इतर साहित्य महामार्गावरच अनेक ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आहेत. दिलीप बिल्डकॉन कंपनीचे कर्मचारी विविध ठिकाणी पडलेले साहित्य गोळा करण्यासाठी गेले असता ते साहित्य चोरीस गेले होते. रस्त्यावर पडलेले साहित्य चोरून जाण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत मिरज शहर पोलिसांना याची माहिती दिली.

डीबी पथकाला माहिती मिळाली की, वीरशैव लिंगायत स्मशानभूमी जुना टाकळीरोड येथे काही इसमांनी लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात जमविले आहे. डिबी पथकाच्या पथकाने सापळा रचून वीरशैव लिंगायत स्मशानभूमी जुना टाकळीरोड येथे छापा टाकून मोसिन शेराली चौधरी, राहुल राजू मद्रासी, रोहन राजेंद्र गौंडर, मोहन राजेंद्र गौंड या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रस्तेकामासाठी लागणारे साहित्य तसेच भंगार असा एकूण 1 लाख 28 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Comment