व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एका शेळीने दिला दोन तोंड अन् चार डोळे असणाऱ्या कोकरास जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत होय. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म दिलेल्या शेळीविषयी आपल्या ऐकण्यात आले असेल. परंतु सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्‍यातील वडगाव हवेली येथे निसर्गाचा चमत्कार झाला असून येथे चक्क शेळी पालक शेतकरी अधिक महादेव ठावरे यांच्या एका शेळीने दोन तोंड आणि चार डोळे असणाऱ्या कोकराला जन्म दिला आहे.

वडगाव हवेली येथील शेळीपालक शेतकरी अधिक महादेव ठावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेळीपालनाचा व्यवसाय करतात. धनगर समाजातील असल्यामुळे त्याच्याकडून खूप शेळ्या आहेत. ते परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेळ्या बसवतात. तर कधी चरायला घेऊन जातात. पन्नासहून अधिक शेळ्या असणाऱ्या अधिक महादेव ठावरे यांच्याकडे असणाऱ्या एका शेळीने एका अनोख्या कोकरास जन्म दिला आहे.

शेती करताना त्याला जोडव्यवसाय म्हणून आपल्याला पशुपालन, शेळीपालन व्यवसाय करता येऊ शकतो. पशुपालनातून दुग्ध व्यवसाय करून त्यातून पैसे मिळवता येतात. तर शेळी पालनातूनही आर्थिक उत्पन्न मिळवता येते. अनेकदा चांगले दूध देणाऱ्या गाई, म्हशीं व इतर शेळींची खरेदी करताना आपल्याला सदर विक्रेत्याकडे जाणे मुश्किल होते. मात्र आता थेट पशुपालक अथवा शेळी विक्रेत्याकडून शेळी अथवा पशूंची खरेदी करता येणार आहेत. गुगलप्ले स्टोअरवरील Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

दररोज शेळ्यांना चरून आणल्यानंतर त्यांना अधिक ठावरे आपल्या गोठ्यात सोडतात. त्यांच्याकडे असणाऱ्या शेळीपैकी एक शेळी गर्भवती होती. त्यांनी ते इतर शेळीप्रमाणे गर्भवती शेळीचीही काळजी घेत होते. दोन दिवसापूर्वी त्यांच्याकडे असणाऱ्या एका शेळीने अनोख्या कोकरास जन्म दिला. या कोकराचे वैशिष्टये म्हणजे त्याला दोन तोंडे असून चार डोळे आहेत. त्यांच्या या शेळीच्या कोकराची वडगाव हवेलीसह पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.