मनपा निवडणुकीबाबत ‘या’ तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

औरंगाबाद – महानगरपालिका निवडणुकीबाबत आता 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचना करायची असल्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा उद्देश संपला आहे, असे शपथपत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने 11 नोव्हेंबरला एक शपथपत्र दाखल केले त्यात आयोगाने म्हटले आहे की, शासनाने पालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आताच्या नुसार पालिकेची निवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्यात यावी.

एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली वॉर्ड रचना आणि वॉर्डांच्या आरक्षण याला आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर, अनिल विधाते व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित होती, पण न्यायालयाच्या संकेतस्थळावर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 15 डिसेंबर अशी तारीख दिसून येत आहे.

You might also like