Saturday, March 25, 2023

डियर तुकोबा…धुळवडीच्या दिवशीची ‘ती’ गोष्ट खरीय ना??

- Advertisement -

कवितांच्या प्रदेशात | विनायक होगाडे

डियर तुकोबा…

- Advertisement -

तुझी वाजणारी वीणा इथल्या सनातनी व्यवस्थेच्या कानठळ्या बसवत होती… तुझ्या अभंगांची गाथा म्हणजे एक घनघोर आव्हान होतं…

तिला ‘त्यांनी’ इंद्रायणीच्या डोहात बुडवली होती पण ती तरीही तरली… नुसती तरली नाही तर ‘त्यांना’ पुरून उरली…

घरची अमाप श्रीमंती तू केव्हाच समाजासाठी वाहून टाकली होतीस…तुझ्याकडे गमावण्यासारखं तसही काय होतं?

हातातील वीणा, मुखातल्या काव्यओळी आणि पांडुरंगरुपी सत्यावरची अविरत श्रद्धा… एवढीच तुझी मालमत्ता…

टाळकुट्या आणि भोळा तुक्या अशी तुझी छबी… भांडकूदळ आवलीच्या वटवटीला त्रासलेला सामान्य संसारी गृहस्थच तू…

पण असा काय डेंजर होता तू? तरीही तुझ्यावर धर्मपीठाने का बरं भरला असेल खटला?

डियर तुकोबा…
आज धुळवड… आजच्या दिवशीच आलं होतं न्यायला तुला एक पुष्पक विमान… जे त्यानंतर कधीच कुणासाठी आलं नाही… जणू काही ते फक्त तुझ्यासाठीच बनवलं गेलं होतं… तू जिथे असशील तिथे विद्रोह करत रहा…

बाय द वे तुकोबा…
वैकुंठात ‘दाभोलकर’ कसे आहेत?

विनायक होगाडे (9011560460)