व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार तर एकजण जखमी

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त प्रवासी ऑटो मलकापूरहून धरणगावकडे चालली होती. तर कंटेनर नागपूरच्या दिशेने चालला होता. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मलकापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

स्थानिक पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरवरून धरणगावकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोला नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकने समोरून जबर धडक दिल्यामुळे या रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात ऑटो रिक्षाचालकासह प्रवाशांमधील एकूण तीन जण ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

भंडाऱ्यात खाजगी कारला झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी
नागपूर येथे शिकणाऱ्या मुलीची भेट घेत रात्रीच्या सुमारास खाजगी चारचाकी वाहनाने पुतण्यासह स्वगावी परतत असताना उभ्या ट्रकला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाले. उमरेड-भिवापूर राज्य महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या अपघातात भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या गंभीररीत्या जखमी झाला होता.