चक्क पोलिसांवरच केला चाकू हल्ला ; धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी एका फरार चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने पोलिसांवरच चाकू हल्ला केला आहे. या धक्कादायक घटनेचं CCTV फुटेज आता व्हायरल झालं आहे. दिल्लीमधील टिळक नगर भागातला हा प्रकार आहे. या भागात बुधवारी रात्री पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. त्यावेळी त्या भागातील एक चोर सागर उर्फ चंपा त्यांनी दिसला. पोलिसांनी त्याच्या गाडीला थांबण्याचा आदेश दिला. त्यावेळी सागरनं पोलिसांवर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मुकेश हे जखमी झाले.

सागरला रोखण्यासाठी त्या जखमी अवस्थेमध्येही कॉन्सेटबल मुकेश यांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी त्यानं मुकेश यांच्या हातामधील बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या बचावासाठी सागरच्या पायावर गोळी मारावी लागली.

या घटनेमध्ये कॉन्स्टेबल मुकेश आणि त्यांच्यावर हल्ला करणारा सागर हे दोघंही जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेच्या CCTV फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर हा 15 दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर चोरीसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like