घरात शिरलेल्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या एकास कारने चिरडल्याने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | वाई तालुक्यातील आसरे येथे मंगळवारी रात्री चोर घरात शिरल्यच्या आवाजानंतर पिता – पुत्र या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी चोराने आपल्याला अोळखले असल्याने पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी वडिलाला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाले होते, त्यांचा दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची वाई पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. जगन्नाथ बापू सणस (वय ७५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, स्वप्निल जगन्नाथ सणस वाई एमआयडीसीमधील कंपनीमधून रात्री घरी आला. शार घराचे दार त्याने ठोठावले असता केले त्याला त्याच्या घरातून कोणीतरी बाहेर पडल्याचे दिसले. ही व्यक्ती घरातून बाहेर पडून सैरावैरा पळ लागल्याने स्वप्निल हा चोर चोर म्हणून ओरडत त्याच्या मागे धावत गेला. त्याचा आवाज ऐकूण त्याचे वडील जगन्नाथ बापू सणस हेही घराबाहेर पडून धावू लागले. घराबाहेर पडलेल्या संशयितास पकडण्यासाठी ते धावत होते.

दरम्यान, अंधाराचा फायदा घेवून संशयित रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये जावून बसला. त्यास सणस पिता-पुत्राने पाहिले. तो गणेश घोलप असल्याचे दिसून आले. अंधाराचा फायदा घेवून घोलप त्याच्या कारमधून पळून जाण्याच्या विचारात असतानाच जगन्नाथ बापू सणस आणि त्यांचा मुलगा स्वप्निल सणस यांनी त्याला तू आमच्या घरी एवढ्या रात्रीचा का आलास? असा जाब विचारला असता घाबरून गणेश घोलपने जोरात कार दामटली. कारची धडक समोर उभ्या असलेल्या जगनाथ सणस यांना बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

त्यांना सातारच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घोलप हा तेथून भरधाव वेगाने निघून गेला. याप्रकरणी स्वप्नील सणस याने वाई पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी गणेश घोलप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.

Leave a Comment