Saturday, June 3, 2023

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव! फर्निचर मॉल आगीत जळून खाक

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये पुन्हा एकदा आगीची (fire) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये नाशिकमधील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग (fire) लागली. हि आग (fire) एवढी भीषण होती कि, या आगीमध्ये (fire) गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घर आणि काही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये (fire) कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाशिकच्या वडनेर दूमाल रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम के फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग (fire) लागली. या दुकानात लाकडी साहित्य असल्यामुळे आगीने (fire) काही वेळात रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये फर्निचर मॉल आणि गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. हि आग एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली कि दुकानाच्या बाजूला असलेली चार ते पाच घरे तसेच काही वाहनेदेखील या आगीच्या विळख्यात सापडली.

हि आग (fire) लागल्यानंतर आतमध्ये असलेले पंधरा-वीस जण वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. नागरी वसाहतीत असलेल्या फर्निचर गोडाऊनला आग लागल्याने नागरिकाकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यास सुरुवात केली. या आगीच (fire) मॉलचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे हि आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय