सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी शेखर कांबळे या व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तात्काळ पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सातारा येथील शेखर कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सातारा, एचडीएफसी बँक यांनी शासनाच्या विविध अशा हक्काच्या योजनांमध्ये सर्व निकषांमध्ये आम्ही बसत असताना देखील आम्हाला डावलले आहे. तसेच आमच्या हक्काच्या जमिनी संबंधित बँक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून हडप केल्या आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=1067307524230485&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing
याबाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन दिली आहेत. अनेकवेळा मागणी करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नसल्याने आम्ही आत्मदहन करण्याचे पाऊल उचलले आहे. शासनाने आमच्या मागणीची लवकर दखल घ्यावी, अशी मागणी आत्म दहनाचा प्रयत्न करणारे शेखर कांबळे यांनी सांगितले आहे.