हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा अखेर आज अमेरिकेत पार पडला. अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्करचा रंगरंगी सोहळा संपन्न झाला. यंदाच्या वर्षी ‘1917’, ‘पॅरासाइट ’ आणि ‘जोकर’ या चित्रपटांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये भारतीय चित्रपटांनी आपली छाप पाडली नसली तरी भारतीय संगीताची जादू मात्र सर्वांना अनुभवायला मिळाली.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये विजेत्यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर बॅकग्राऊंडला याआधीच्या ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या ओरिजनल गाण्यांचा मोंटाज सुरु होता. या मोंटाजमध्ये बॉलिवूड चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’या चित्रपटा मधील ‘जय हो’ या गाण्याचाही समावेश होता.२००९ मध्ये ८१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘जय हो’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला होता. तसंच या गाण्यासाठी संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांनादेखील ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वाधिक अपेक्षा या ‘जोकर’ चित्रपटाकडून होत्या. कारण या चित्रपटाला सर्वाधिक ११ नामांकनं मिळाली होती. परंतु या चित्रपटाला केवळ दोनच पुरस्कार मिळवता आले. त्या खालोखाल ‘1917’ या चित्रपटाला १० नामांकने मिळाली होती. मात्र त्यांनाही केवळ दोनच पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.