भुतांच्या रेस्टॉरेंटमध्ये माणसांची खानावळ; हिंमत असेल तरच जा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वायरल स्टोरी : हे एक असे रेस्टॉरेंट आहे. जिथे जाण्यासाठी फक्त बाहेरून नव्हे तर खरीखुरी वाघाची छाती हवी. कारण येथे रक्ताळलेला पिसवा सुरा नाही नाही.. तलवार घेऊन तुमची वाट पाहत असतो. तर बाकीची भुते भयानक चेहऱ्याने तुमचे स्वागत करतात आणि तुमच्या मानगुटावर पकड धरून विचारतात कि काय खाणार. बापरे! नुसत्या कल्पनेनेच थरकाप उडाला ना? मग प्रत्यक्षात पाहिलात तर काय होईल? तुम्ही अनेक प्रकारची रेस्टॉरेंट आजपर्यंत पाहिली असाल पण, अस रेस्टॉरंट पाहीलायत का? जे भुतांच्या आधीन असेल.

स्पेनमध्ये ‘ला मासिया एकांटडा’ नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये हे असे भीतीदायक वातावरण खरोखर अनुभवता येते. कारण मुळातच ज्यांचे हृदय कमकुवत आहे, दम्याचे पेशंट, गर्भवती महिला आणि १४ वर्षाखालील मुलांना इथे प्रवेशच देत नाही. अगदी अपंग लोकांनाही येथे प्रवेश दिला जात नाही आणि फोन, कॅमेरा आत घेऊन जायची परवानगी सुद्धा नाही. म्हणजे एकदा का आत गेलात कि मग..

तसं कुणी काबुल करत नाही कि ते घाबरतात म्हणतात फक्त भितो आम्ही बाकी काही नाही. त्यांनी तर इथे एकदा जाऊन याच. भूत आहे का नाही हा विषय वेगळा. पण पडकी विहीर, रात्री पैंजण वाजण्याचा आवाज, वटवाघळाचे फडफडणे आणि दारं खिडक्या वाजली कि कुणाची सिट्टी पिट्टी गुल्ल होत नाही ते सांगा.

मुख्य म्हणजे या रेस्टॉरेंटमध्ये ग्राहकांचे मनोरंजनहि भुतंच करतात. हे मनोरंजन असे असते कि भीतीने शरीरातली हालचाल पण जाणवेनाशी होते. खरंतर त्याचे उद्देश्य सुद्धा हेच असते. या रेस्टॉरंटला चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे आणि घाबरू नका ओ. येथे प्रत्यक्ष भुत नाहीत. इथले वेटरच भुताचे पोशाख करतात आणि घाबरवतात. येथे दिवसातले फक्त ३ तासच जेवण सर्व केले जाते. या रेस्टॉरेंटमध्ये एकावेळी ६० लोक बसू शकतात. यासाठी अगोदर बुकिंग करावे लागते. शिवाय एकदा आत प्रवेश केला कि इथली भूत काय करतील तुमच्यासोबत याचा काही नेम नाही. यामुळे लोक आधीच धास्तावलेली असतात आणि जेवण पण घाबरत घाबरतच करतात. त्यामुळे तुम्ही घाबरत नसाल तर या रेस्टॉरेंटमध्ये जा बाबा.. पण घाबरत असाल तर मुळीच त्रास घेऊ नका.

Leave a Comment