पाण्याच्या टँकरने सात वर्षीय चिमुकलीला चिरडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी |आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेलेल्या सात वर्षीय चुमुकलीला मनपाच्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज (7 जून) औरंगाबाद शहरातील जयभवानीनगर येथे घडली.नेहा गौतम दंडे वय-7 वर्ष ( रा.बिदर राज्य.कर्नाटक) असे ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

बहीण औरंगाबादेत राहत असल्याने मृत नेहा ही आई सोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत बहीनीच्या घरी जयभवाणीनगर येथे आली होती.

आज ती दुपारी बारा वाजेच्या सुमारास आईस्क्रीम चा कोण आणण्यासाठी किराणा दुकानात गेली होती आईस्क्रीम घेतल्यानंतर ती घरी जात असताना पाणी पुरवठा करणाऱ्या मनपाच्या टँकरने तिला चिरडले या अपघातात तिचा चेंदामेंदा झालं व ती जागीच ठार झाली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी टँकर चालक देविदास जाधवला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक उद्धव जाधव यांनी दिली.

Leave a Comment