इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार; मोदींची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली येथील इंडिया गेट इथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. ट्विट मध्ये मोदींनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र शेअर केल आहे.

संपूर्ण देश नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करत असताना मला हे जाहीर करण्यास आनंद होत आहे की त्यांचा ग्रॅनाईटमध्ये घडवलेला पुतळा इंडिया गेटवर उभारला जाईल. भारतावर त्यांचं जे ऋण आहे, त्याचं हे प्रतिक असेल. असे मोदी म्हणाले.

इंडिया गेट आणि राष्ट्रीय स्मारकच्यामध्ये एक रिकामी चबुतरा आहे. याच ठिकाणी नेताजींचा पुतळा उभारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या ६० वर्षांपासून हा चबुतरा रिकामी आहे. याआधी या चबुतऱ्यावर जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. १९६८ साली तो चबुतऱ्यावरुन हटवण्यात आला आणि तो कोरोनेशन पार्कमध्ये पाठविण्यात आला होता. तेव्हापासून हा चबुतरा रिकामीच आहे.

Leave a Comment